Skip to content

हापूस आंब्याची आवक वाढल्याने ; बाजार घसरला आंबा बागायतदार अडचणीत


हवामान बदलामुळे हापूस आंब्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाला घाबरून आंबा पिकण्याअगोदर काढून घेतल्याने बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हापूस आंबा बाजारात आला असून असून सामान्य जनतेला परवडणारा दरात उपलब्ध झाला आहे.

आंब्याचे भाव बाजारात 400 ते 800 रुपये डझनदरम्यान आहेत. अवकाळी पाऊस, धुक्‍यामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हापूसची बाजारात आवक झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर जास्त होते. आवकही अपेक्षेएवढी होत नव्हती. यंदाच्या हंगामात आंब्यांची आवक टप्याटप्याने होत गेली. बाजारात कोकणातून हापूसच्या 10 ते 15 हजार पेट्यांची आवक झाली.

अक्षय तृतीयेच्या आधी आंब्याची आवक वाढली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच अक्षय तृतीयेला आंब्याची मोठी आवक झाली. आंब्याची आवक वाढल्याने भावात घट झाली.सामान्यांना हापूसची चव चाखता येणार आहे.फळ बाजारात कोकणातून एकूण मिळून 25 ते 30 हजार पेट्या हापूसची आवक झाली. कच्चा हापूस पेटी 800 ते 1200 रुपये तर तयार हापूस पेटी 1800 ते 2000 रुपये इतकी आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!