मराठवाड्यात सोयाबीनला कमाल बाजार भाव 8300 रुपये मिळाला आहे. बाजार भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात नेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक घटली आहे .सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली तर बाजार भाव मिळत नाहीत.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची 1266 क्विंटल इतकी आवक झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. लातूर, परभणी, विदर्भात भागात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांन समोर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुधवारी गंगाखेड आणि मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल 7000 रुपयांचा भाव मिळाला आहे. सोयाबीनला सर्वसाधारणपणे 6700 रुपयांपर्यंतचा भाव मिळतो आहे. सोयाबीन उत्पन्नाला किमान भाव 5800 रुपये, उत्तमदर्जाचे सोयाबीन उत्पन्नाला कमाल भाव आठ हजार तीनशे रुपये मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम