Skip to content

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर केली खोचक टीका


मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरच शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांनी राजसाहेबाना अयोध्या करता मोदींची मदत घेण्याचा सल्ला देत खोचक शब्दांत टीका केली.

काकाच्या अयोध्या दौऱ्यानंतर युवासेना नेते आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही अयोध्या दौरा करणार आहे. परंतु आता मोठीबाब समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुंबई, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातून विरोध होत आहे. राज ठाकरेंनी माफी मागावी, तरच अयोध्येत प्रवेश देऊ, अशी ठाम भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर अनेकदा टीका केल्या आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केले असून, राज ठाकरे यांना सल्ला दिला आहे यातच आता राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींची मदत घ्यावी कदाचित त्यांना माफीनाम्याची गरज पडणार नाही, असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!