राज ठाकरेंना खरच अटक होणार का ? कायद्यात काय आहे तरतूद वाचा सविस्तर

0
3

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडली होती. या सभेमध्ये गुढीपाडव्याच्या आणि उत्तर सभे प्रमाणेच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सभेसाठी दिलेल्या अटीपैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर लावण्यात आलेली  कलमं ही अजामीनपात्र असुन, यामध्ये जामीन देण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे. पोलीस नोटीस देऊ शकतात, हजर राहण्यास सांगू शकतात, किंवा आदेशांचं पालन न केल्यास अटकही होऊ शकते.  दरम्यान, राज ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये राज ठाकरे यांना अटक होऊ शकते का? याबाबत कायदा काय सांगतो ह्याचा थोडक्यात आढावा घेऊयात.

राज ठाकरे यांच्याविरोधात कलम ११६, ११७ तसेच महाराष्ट्र पोलीस ॲक्ट १३५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय १५३ अ कलमानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असेदेखील सांगितले जात असुन, यातही ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद आहे. दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसेच चिथावणीखोर वक्तव्य करणे, अटींचं उल्लंघन करणे यानुसार ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

कलम १५३ अ

धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये वाद निर्माण करणे आणि सद्भावना राखण्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्मिती करणे तसेच वरील अन्य कोणत्याही कारणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कृत्ये करणे.

शिक्षेची तरतुद : तीन वर्षांपर्यंत कारावास, किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. उपासन करण्याच्या ठिकाणी केलेला गुन्हा, तसेच कलम (१) मध्ये  नमूद केलेला गुन्हा कोणीही उपासनेच्या ठिकाणी किंवा धार्मिक उपासना किंवा धार्मिक समारंभ पार पडत असलेल्या  कोणत्याही संमेलनात अशा प्रकारचे कृत्य अथवा भाषण केल्यास तुरुंगवासाची शिक्षा होईल. जे पाच वर्षांपर्यंत वाढू शकते आणि दंडासही जबाबदार असेल.संबंधित गुन्हा अजामीनपात्र आहे.

कलम ११६

गुन्हा करण्यासाठी मदत करणे किंवा उकसवणे

कलम ११७

गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण देणे यासाठी हे कलम असून, हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या कलमाअंतर्गत तपासानंतर अटक करण्यात येऊ शकते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here