” राज ठाकरेंच्या भाषणाचे अवलोकनकरूनच गुन्हे दाखल ” – गुहराज्यमंत्र्यांची प्रतिक्रीया

0
5

मुंबई प्रतिनिधी :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संभाजी नगरमधील सभेत केलेल्या वक्तव्यांवरून , त्यांच्या विरोधात १५३ ‘अ ‘ हे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यामुळे आता त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

तर ह्याबाबतीत भाष्य करत राज्याचे ग्रहराज्यमंत्री संभूराज देसाई यांनी प्रथम प्रतिक्रिया देत ” संभाजी नगर मध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेस काही अटी व शर्ती लावूनच परवानगी देण्यात आली होती . पोलिस आयुक्तांनकडून करण्यात आलेल्या अवलोकनात ह्या अटींचे उलंघन झाले असल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामूळे पोलिस आयुक्तांकडे असलेल्या अधिकारानुसार नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले . उलंघन झालेल्या अटी , शर्तींनुसार कलमांखाली गुन्हे दाखल होणार आहेत . तर त्यामध्ये केलेल्या तरतुदींच पालन झालच पाहीजे  . असे म्हणत संभूराज देसाईंनी आपली प्रतिक्रीया मांडली .

याचरोबरीने राज ठाकरेंवर दंगे भडकवण्यासाठी व चिथावणीखोर वक्तव्यकेल्याबद्दल देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . त्यामुळे हि अटक टाळण्यासाठी राज ठाकरे अटक पूर्व जामिनासाठी अपिल करू शकतात . काही अटींवर जामिन मिळण्याची शक्यता आहे . परंतु ,  जामिन न मिळाल्यास राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार राहील असे चित्र आहे . तरी संभाजी नगर पोलिसांनी अत्यंत विचार करून गुन्हे दाखल केले असल्याचा दावा कायदातज्ञांनी केला आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here