Skip to content

यवतमाळ येथील शेतकरी आक्रमक; मंत्रालयासमोर भोंगे वाजवण्याचा शेतकर्‍यांचा इशारा


राज्यात चाललेल्या भोंग्याच्या वादातून राजकीय परिस्थिती बिघडली आहे . यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकरयांनी मंत्रालयासमोर भोंगे लावण्याचा इशारा दिला. दिनांक 4 मे शेतकरी मंत्रालयाच्या समोर आंदोलन करता येणार असल्याचे देखील यवतमाळ येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे भोंगे आणि हिंदुत्व वरील वादातून चांगलेच चर्चेत आहेत. राज ठाकरेंनी 4 हे रोजी अल्टिमेट दिल्याने मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत आक्रमक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. परंतु दुसरीकडे दिवसेंदिवस शेतकरी हतबल होत चालला आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेते लक्ष देत नाही अशी टीका यवतमाळ येथील शेतकऱ्यांनी केली आहे. नेत्यांची रोज वाजणारे भोंगे बंद करा असा इशारा देखील शेतकर्‍यांनी यावेळी दिला आहे.

यवतमाळ येथील शेतकऱ्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले, राज्यातील राजकीय भोंगे बंद करून शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, राज्यात चाललेल्या भोंगेबाजी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न, पेट्रोल डिझेलचे भाव वाढणे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे कोणत्याही नेत्याचे लक्ष नाही त्यामुळे आज 4 मे रोजी मंत्रालयासमोर जाऊन आंदोलन करणार आहोत.

संत्पत शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर भोंगे लावण्याचा इशारा देखील दिला आहे. नेत्यांची भोंगे बाजी पाहिजे आता बंद करा. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या घरी आम्ही अन्नधान्य देऊ परंतु आमच्या प्रश्‍नांकडे लक्ष द्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आव्हान देखील शेतकऱ्यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!