Skip to content

मुंबईतील मशिदी ‘हायअलर्टवर ‘ ; राज ठाकरेंच्या इशाऱ्याने सुरक्षा वाढवली


मुंबई प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्यावरून संपूर्ण राज्याचं राजकारण दणाणून सोडलयं , त्यात त्यांच्या संभाजीनगर मधील सभेनंतर राज्यात वातावरण चांगलच तापलेल दिसून येतय . राज ठाकरेंच्या ४ मे पर्यंतच्या अल्टीमेटम नंतर व ” ४ तारखे नंतर मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू ”  ह्या वक्तव्या नंतर पोलीस खात आता सज्ज झालं आहे .

मुंबईतील मिनारा मशिदी बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे . ईदच्या निमित्ताने अनेक मुस्लिम बांधव मशिदींमध्ये प्रार्थने साठी एकत्र येत असतात . आणि एकंदरीतच राज्यात परिस्थिती बघता , कायदा सुव्यवस्था रखण्यासाठी ही सुरक्षा वाढवली गेली आहे. मिनारा मशिदी सोबत इतर मशिदींन बाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे . तर पोलीसांबरोबर QRT ( क्वीक रिस्पॉन्स टिम) चे जवान ही तैनात करण्यात आले आहेत . कुठेही कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये म्हणून मुंबई पोलीसांना ही विशेष खबरदारी घेतल्याचे पहायला मिळतय . तर कसलाही गोंधळ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक नोटीस सुध्दा मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे . एकुणच  सगळ्याच बाबतीत मुंबई पोलिसांची चोख व्यवस्था पाहायला मिळतेय.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!