मनेसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरि यांची अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव ., न्यायाधिश उपस्थित न राहू शकल्याने अडचणींत वाढ

0
2

मुंबई प्रतिनिधी :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ तारखेला संभाजीनर येथील सभेत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर हनुमान चालीस लावण्याचे आव्हान सर्व मनसे कार्यकर्त्यांना केले होते. 

        त्यानंतर ४ तारखेला अनेक मनसैनिकांकडून  मशिदींसमोर हनुमान चालीसा लाऊडस्पिकर वर लावण्यात आली . त्याचबरोबर आंदोलनही करण्यात आले . याच आंदोलनादरम्मान शिवाजी पार्क परीसरात मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेत असताना दोघांनी ही आपल्या खाजगी वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न केला . पळून जाताना भरधाव वेगाने गाडी नेल्याने संपूर्ण घटनेत एका महिला पोलीस कर्मचारिकेस धक्का लागला . त्यामुळे सदरप्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखला केला आहे .

      याप्रकरणानंतर फरार असलेले संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटके पासून वाचण्यासाठी कोर्टत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता परंतु , काही कारणास्तव न्यायाधिश उपस्थित राहू न शकल्या मूळे जामीन अर्जावरील सुनावणी पुढे जाऊ शकली नाही . त्यामूळे हि सूनावणी आता १७ मे रोजी होणार आहे . एकंदरीतच ह्यामुळे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या वर अटकेची टांगती तलवार मात्र कायम राहील असे चित्र दिसून येते .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here