Skip to content

मनसैनिकांकडून हनुमान चालीसाचे पठण; मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी सरकारला 4 मेला दिलेला अल्टिमेट संपुष्टात आली आहे. मनसेकडून मुंबईतील काही ठिकाणी नमाजवेळी हनुमान चालीसाचे पठण मनसेचे कार्यकर्ते सुरू केले. मनसेकडून कांदिवली आणि मुंब्रामध्ये नमाजवेळी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. ठाणे पोलिस मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करू शकतात.

राज्यभरातील मशिदींवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून आंदोलनाची घोषणा केली आहे. मंगळवारी ईदच्या दिवशी रात्री मुंबईतील कांदिवली चारकोप आणि मुंब्रा येथे परिसरात अजानच्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा लावला प्रकार घडला आहे.

नवी मुंबई डोंबिवली कल्याण मुंब्रा अशा ठिकाणाहून सैनिकांनी हनुमान चालीसा पठाण पहाटे केल्याचा प्रकार घडला आहे. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे.ठाणे पोलिस मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करू शकतात.

कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना अनधिकृत भोंगे वाजविणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावण्याचे आवाहन केले होते.मनसे सोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!