Skip to content

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्र 


भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असताना. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. ही भेट मनसे नेत्यांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, मुस्लीम संघटनांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त आणि जॉईंट क्राईम कमिशनर यांनाही धमकीच्या पत्राबाबत माहिती दिली असं बाळा नांदगावकर यांनी सांगितली.

माझ्यासोबत राज साहेबांनाही जीवे मारण्याचे धमकीचे पत्र देण्यात आल आहे. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.या धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले.पत्र कोणी पाठवलं याबाबत काही माहिती नाही, पण ते पत्र पोस्टाने आलं, असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!