Skip to content

भाजप नेते प्रवीण दरेकरांनी, संजय राऊतांनवर साधला निशाणा


भाजप नेते प्रवीण दरेकरांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. राज ठाकरेंच्या केलेल्या भाषणावर , प्रवीण दरेकर म्हणाले बाहेरचे राज्यातले लोक येतात दंगली घडवतात, कोण कुठले गुंड जबाबदार निराधार पद्धतीने बोलणे, आणि विरोधक अनिरुद्ध तिरस्कार करत बोलण्याचे संजय राव त्यांचे काम आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टिप्पणीवर सोमवारी, दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘केंद्रीय तपास संस्था असलेल्या ‘सीबीआय’वर राऊतांचा विश्वास नाही, केंद्रीय गुप्तचर विभागावर विश्वास नाही, म्हणून ढोल पिटायचे आणि सोयीस्कररित्या ‘सीबीआय’ अहवाल काय आहे, गुप्तचर विभाग काय बोलतो, हे सांगायचे. म्हणजे, सोयीचे बोलायचे आणि वागायचे, हे राऊत यांचे काम आहे.’

मैदानात येऊन शिवसैनिकांसारखे काम केले, तरच खासदार संजय राऊत यांच्या बोलण्याला अर्थ प्राप्त होईल. त्यांची विधाने म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या प्रकारची आहेत,’ असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!