Skip to content

तब्बल 21 दिवसांनी आई-वडिल आणि मुलांची होणार भेट


अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा गेल्या २१ दिवस कुटुंबापासून लांब आहे. अशातच त्यांची मुलांसोबत देखील भेट झाली नाही. या भेटीसाठी राणा दांम्पत्याला भेटण्यासाठी यांची मुलगी आणि मुलगा आज दिल्लीला गेले आहेत.

राणा दाम्पत्याला १२ वर्षांची आरोही नावाची मुलगी, तर सहा वर्षांचा रवनीर नावाचा मुलगा आहे. राणा दाम्पत्य तुरुंगात असलेल्या काळात दोन्ही चिमुकल्यांनी माझ्या आई-वडिलांची लवकर सुटका होऊ दे, या साठी साकडं घातलं होत. त्यानंतर नवनीत राणांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचार घेतल्यानंतर राणा दाम्पत्या दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांकडे ठाकरे सरकारची तक्रार केली. पण, आई-वडिलांपासून एकवीस दिवस चिमुकल्याची झालेली ताटातूट पाहून सगळ्यांनाच हळहळ व्यक्त केली. चिमुकल्यांना आशा होती की, तुरुंगातून सुटल्यानंतर आई-वडिल थेट अमरावतीला परत येतील परंतु तसे झाले नाही. आई-वडिल तुरुंगात न आल्याने मुलांनीच थेट दिल्ली गाठून तब्बल २१ दिवसानंतर आई-वडिलांची भेट घेतली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!