Skip to content

जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्ती यंत्रणा गतीमान, बळकट करण्याचा विजय वडेट्टीवाराचा आदेश


गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पावसामुळे आपत्तीला तोंड द्यावे लागले. या वर्षीही सरासरीपेक्षा जास्त व वेळे आधीच पाऊसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज दिसत आहे. हा अंदाज पाहून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती निवारणाची कामे करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पुणे महसूली विभागातील जिल्ह्यांची मान्सूनपूर्व ऑनलाइन आढावा बैठक झाली. या बैठकीत वडेट्टीवार म्हणाले, राज्यात अचानक येणारे पूर, दरडी कोसळणे आदी आपत्तीला तोंड देण्यासाठी स्थानिक ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा गतीमान असण्याची गरज शासन प्रयत्नशील आहे. आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असल्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पूर व अतिवृष्टीमुळे पूर नेण्याकरिता जास्त वस्ती असणाऱ्या परिसरात पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई, धोकादायक वृक्ष अथवा फांद्या तोडणे, रस्ते दुरुस्ती, बांधकामाची कामे पूर्ण कराण्याचा इशारा दिला आहे. यंदाही पाऊस लवकर सुरू होणार आहे, हे लक्षात घेता सर्व यंत्रणांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली आपत्ती यंत्रणा बळकट करण्याचा आदेश वडेट्टीवार यांनी दिला आहे.

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे वेगाने आणि वेळेचा आधीच करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी,मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येईल. सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे आदेश वडेट्टीवार यांनी दिले.मान्सूनपूर्व ऑनलाइन आढावा बैठकीत यावेळी पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्‍त उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!