क्रीडा जगतातून रविवारी एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. सायमंड्स यांच्या वयाच्या ४६ व्या वर्षी अचानक निधन झाल्याने क्रीडा क्षेत्रात धक्का बसला आहे.
अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे कार अपघातात मृत्यू झाला. शहराच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री 10:30 च्या सुमारास अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावर उलटल्याचे समोर आले आहे. दाखल केले असता अनेक प्रयत्न अपयशी ठरले आणि सायमंड्सला मृत्यू झाला.
सायमंड्सची कारकीर्द चमकदार होती. त्याने 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या आहेत. सायमंड्सचा नावावर 26 कसोटीमध्ये 1462 धावा आहेत. तसेच 24 विकेटही आहेत. सायमंड्सने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम