Skip to content

आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही, महाराणा प्रताप सेनेची घोषणा


आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही, महाराणा प्रताप सेनेची घोषणा

राज्यात भोंगा विरूद्ध हनुमान चालिसा वाद सुरू असतानाच आता अयोध्या दौऱ्यावरून राजकीय क्षेत्रात तणावाचं वातावरण निर्माण झाले. काकाच्या अयोध्या दौऱ्यानंतर पुतण्या सुध्दा अयोध्या दौरावर जात असल्याने ऐकला आले आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍यावर महाराणा प्रताप सेनेने मोठी घोषणा केली आहे.

राज ठाकरें पाठोपाठच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील अयोध्येला न येण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला ,राज ठाकरेंनी अयोध्येत येऊन दाखवावेच, त्यांना आम्ही पाय ठेऊन देणार नाही असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.

आदित्य ठाकरे हे देखील येत्या १० जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. परंतु महाराणा प्रताप सेनेचे संस्थापक राजवर्धन सही आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आयोध्या दौऱ्यावर लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!