सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा आणि चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तीन दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन सुरू होते. प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतरदेखील आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम होते. परंतु माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. ६) रोजी सायंकाळी आंदोलन आणि प्रशासनात यशस्वी मध्यस्थी केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी चांदवड देवळाचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते फळांचा रस देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली आहे.
Gold Silver Rate | दागिने खरेदीचा असा चान्स पुन्हा नाही
महाराष्ट्र शासनाने दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये देवळा आणि चांदवड या तालुक्यांचा समावेश नसल्याने शनिवार (दि. ४) नोव्हेंबर पासून देवळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष दिनकर निकम, चांदवड-देवळा विधानसभा अध्यक्ष स्वप्निल सावंत, दिलीप पाटील, अरुणा खैरनार हे अन्नत्याग उपोषणाला बसलेले होते. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनामार्फत उपोषण सोडण्याविषयी वेळोवेळी विनंती करण्यात आलेली होती. परंतु आंदोलक त्यांच्या निर्णयावर ठाम होते.
चांदवड तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे दुष्काळी मोर्चा; शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
सोमवार (दि. ६) रोजी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी शिष्टाई करून प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, किशोर कदम, उद्धव पवार यांच्याशी चर्चा करून तोडगा काढल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र 30 डिसेंबर पर्यंत देवळा आणि चांदवड तालुका दुष्काळी जाहीर केला नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा स्वप्नील सावंत यांनी दिला. यावेळी रामा पाटील, दिलीप आहेर, जगदीश पवार, हिरामण आहेर, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम