Ginger Price : टोमॅटो, मिरची, कोथिंबीर इत्यादी भाज्यांच्या भाववाढीबरोबरच आल्याच्या दरातही मोठी उसळी आली आहे. एकाच वर्षात आल्याच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. परंतु किंमत वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची लागवडीची व्याप्ती कमी होणे. गेल्या वर्षी 400 रुपये किलोने विकले जाणारे आले यंदा 20 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहचले आहेत म्हणजेच अद्रकाला बाजारात 200 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. दुसरीकडे, किरकोळ बाजारात ग्राहकांना ३०० ते ४०० रुपये किलो दराने आले मिळत आहे.
Political : पंकजा मुंडे व धनंजय मुंडे जेव्हा एकत्र येतात….
आल्याचा प्रतिकिलो 160 ते 200 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळत आहे, तर बाजारात त्याचा भाव 300 ते 400 रुपये किलो आहे. जर व्यापारी शेतकऱ्यांच्या घरून आले नेत असतील तर त्यांना 16000 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 160 रुपये किलो असा भाव मिळत आहे. मात्र बाजारात नेले असता भावात प्रतिक्विंटल चार हजार रुपयांची वाढ होत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी आले बाजारात नेऊन विकत आहेत.
दोन महिन्यांपासून आल्याला 8000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. तर गेल्या वर्षी 400 रुपये प्रतिक्विंटल दर होता. गेल्या वर्षी पेरण्या भरपूर झाल्यामुळे दर कमी होता. आले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांची पेरणी फारच कमी होती. कारण खूप नुकसान आधीच झाले होते. त्यामुळेच यंदा आल्याचे भाव भडकले आहेत. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी आल्याची लागवड केली त्यांना चांगला नफा मिळत आहे. त्याचे गेल्या वर्षीचे नुकसान भरून काढले जात आहे.
Cotton rates : कापूस उत्पादकांसाठी खुशखबर…
यंदाही आले लागवडीची व्याप्ती खूपच कमी असेल. कारण बियाणे खूप महाग होत होते. बाजारात बियाणे नाही. मार्चमध्ये बी संपले होते. त्यानंतर 8000 रुपये प्रतिक्विंटल दराने बियाणे खरेदी करण्यात आले. त्यामुळे आल्याच्या बियाणे महाग झाल्याने कोणीही त्याची खरेदी करत नाहीये त्यामुळे यावर्षी देखील आल्याची कमी लागवड होणार असल्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम