Weather Updates | रब्बी हंगामात आता शेतकऱ्यांना अवकाळी पावसाशी सामना करावा लागणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे.
राज्यात पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हा भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आज तुरळक भागात दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजदेखील देण्यात आला आहे.
पुढील ४ ते ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भ या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २५ व २६ नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आलेला आहे.
Malegaon | अद्वय हिरे यांना आता न्यायालयीन कोठडी
तसेच, वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. रविवारी पावसाचा जोर जास्त प्रमाणात दिसू शकतो. मुंबईत पावसाचा अंदाज असल्याने हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याचीही शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात काही भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता तर, उत्तर महाराष्ट्रातही वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळू शकतो. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी गारा पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती तसेच बुलढाणा ह्या भागात शनिवारपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
Nashik News | नाशिकच्या अंबड भागात पुन्हा बिबटयांचा वावर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम