Pandharpur vari : त्या वारकऱ्यांना मिळणार आता विमा संरक्षण…

0
26

 

Nashik : गेल्या शेकडो वर्षांपासून राज्यातील ठिकठिकाणांहून आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी निघत असते. याच पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या विठ्ठल भक्तांना आता शासनाकडून विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

राज्यातील विविध ठिकाणाहून आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय हा पंढरपुरामध्ये दाखल होत असतो. जवळपास महिना- दीड महिना आधीपासूनच पायी वारी ठिकठिकाणांहून निघत असतात. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. यामुळे संबंधित वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून शासनाने “विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना” लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून यामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. तीस दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू करण्यात येणार आहे. तर वारीमध्ये दुर्घटनेत कायमचं अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये संबंधित वारकऱ्याला देण्यात येणार आहेत. तर अंशतः अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषध उपचारासाठी 35 हजार रुपयांपर्यंतचा खर्च देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. तर याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल आहे.

परिषद दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील होत असतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य व्हावं या उद्देशाने मुख्यमंत्री शिंदे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पंढरपूरच्या पायी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here