सोमनाथ जगताप – देवळा | विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणारा विषय म्हणजे गणित आणि विज्ञान. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना मिळावी या हेतूने भावडेच्या व्ही. के. डी. इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांच्या हस्ते पार पडले.
Vinod Tawde | काय सांगता तावडे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…?
विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे या प्रदर्शनात मांडले. त्यात शेतीसह दैनंदिन उपकरणे व्यॅक्युम रेन, हायपरलूप, फ्लूड अलर्ट, ड्रीप सिस्टम, ग्रीन हायवे, वॉटर प्युरिफायर, सोलर कार, सोलर इरिगेशन, स्मार्ट हेल्मेट, एक्सीडेंट प्रोटेक्शन मॉडेल, बियाणे पसरविणारे यंत्र आदी प्रदर्शनांचा समावेश होता. या प्रदर्शनासाठी इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते आठवी, नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आलेले होते.
देवळा | या प्रदर्शनात या विद्यार्थ्यांनी मारली बाजी..
पहिली ते चौथी गटात प्रथम क्रमांक गौतम माळी, द्वितीय क्रमांक आदित्य खैरे, तृतीय क्रमांक विशाल बच्छाव यांनी पटकवला तर पाचवी ते आठवी गटात प्रथम योगेश अहिरे, द्वितीय प्रणिती जगताप, तन्वी पगार, तृतीय खुशाल जाधव, ओम जाधव यांनी मिळवला. तसेच नववी ते बारावी गटातून प्रथम मिताली देशमुख, द्वितीय रितेश पवार, प्रथमेश खैरनार, तृतीय सुजल पवार, पियुष शेवाळे यासर्व विद्यार्थ्यांनी नववी ते बारावी गटातून यश संपादन केले.
Bus Station | बसस्थानकांचे रुपडे पालटणार; मंत्री दादा भूसेंची मोठी घोषणा
याप्रसंगी प्राचार्य एन. के.वाघ, एस.एन. पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. सदर प्रदर्शनासाठी विज्ञान विभाग प्रमुख कल्पेश खैरनार, विज्ञान शिक्षक तुषार निलख, वंदना जाधव, वैशाली गांगुर्डे, हर्षदा पाटील, अनिल भालेराव, साबळे जगदीश, नितीन राऊत, वैशाली देवरे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम