देवळा | लैंगिक अत्याचार प्रकरणी उमराणे गाव कडकडीत बंद; आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी 

0
11

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी : देवळा | मालेगाव तालुक्यातील मौजे गंगासागर वस्ती, दाभाडी पिंपळगाव येथे वास्तव्यास असलेले अदिवासी कुटुंब उस तोडणी साठी बाहेरगावी गेले असता त्यांच्या दोन चिमुरड्या मुली घरीच असल्याने एका ५५ वर्षी नराधमाने एका ९ वर्षीय मुलीला आमीष दाखवत शेतामध्ये घेऊन जाऊन अमानुषपणे लैगीक अत्याचार केला.

Nashik News | आज नाशिक जिल्ह्यात असे असणार हवामान

या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि. २६) रोजी उमराणे गावात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवत घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या ५५ वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

१२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पुजनाच्या तसेच ऐन दिवाळी सणाच्या दिवशी हि एक खुपच लज्जास्पद आणि काळीमा फासणारी घटना घडली. ९ वर्षीय चिमुरडी वरती एका ५५ वर्षाच्या नराधमाने अमानुष पणे लैगीक अत्याचार केला आणि या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज रविवारी (दि. २६) रोजी संपुर्ण उमराणे गाव आणि गावातील सर्व समाज आणि जनतेने एकोपा दाखवत संपुर्ण गाव बंदची हाक दिली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उमराणे येथील आदिवासी एकलव्य वस्तीतून आक्रोश मोर्चाला सुरवात करण्यात येऊन हा मोर्चा उमराणे गावातील मुख्य शिवाजी चौकात धडकला. यावेळी या घटनेचा समाज बांधवांनी निषेध व्यक्त करत नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. या चिमुरडीला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली.

Gold Silver rate | सोन्याच्या दरांत चढ सुरूच; असे आहेत आजचे दर

याप्रंसगी बाजार समितीचे सभापती प्रंशात देवरे, माजी सभापती विलास काका देवरे, उपसरपंच (उबाठा गट) भरत देवरे, विद्रोही आदिवाशी संघटनेचे पप्पू सोनवणे, भाऊसाहेब मोरे, गुलाब देवरे, सदिप देवरे आदींसह आदिवासी बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here