Uddhav Thackeray | मविआ सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री..?; सर्वाधिक जागा काँग्रेस लढवणार

0
41
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray |  एकीकडे राज्यात अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू असून, दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहे. काल त्यांनी आपल्या सर्व खासदारांची बैठक घेतली आणि यानंतर त्यांची काँग्रेसच्या हायकमांडसोबतही दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान, ऊदह ठाकरे ह्याअ कथित उद्देश्यासाठी दिल्लीत गेले आहेत त्यात त्यांना मोठे यश आल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची जंगी तयारी सुरू असून, इतर नेते राज्यात दौरे करत असताना उद्धव ठाकरेंनी थेट दिल्ली गाठत आपली खुर्ची सेफ करून घेतली आहे. दरम्यान, बुधवारी काँग्रेस (Congress) सोबतच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आणि त्या मागणीला यश आल्याची माहिती मध्यमांमधून समोर येत आहे.(Uddhav Thackeray)

त्यानुसार आता महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) लवकरच विधानसभा निवडणुकीसाठी आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा उद्धव ठाकरे हेच असणार आहेत, असा निर्णय दिल्लीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी ऐकवली मोदी अन् अमित शहांची ऑडिओ क्लिप

Uddhav Thackeray | काँग्रेसला सर्वाधिक तर, शरद पवार गटाला सर्वात कमी जागा 

बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि जागावाटपाबाबत चर्चा झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढण्यावर एकमत झाले असून, जागावाटपात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला (shivsena ubt) दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP Sharad Pawar) तीन नंबरच्या जागा मिळतील, अशी माहिती आहे.

Uddhav Thackeray | ही केमिकल लोचाची केस; यांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय..?

तिन्ही पक्षांच्या १५५ सीटिंग जागा सोडून इतर जागांबाबत चर्चा 

तसेच या बैठकीत विधानसभा निवडणुकीत घटक पक्षांच्या मागील निवडणुकीतील विजयी एकूण जागा सोडून इतर जागांबाबत चर्चा होईल. सध्या तिन्ही पक्षांच्या मिळून महाविकास आघाडीकडे एकूण १५५ जागा आहेत. या सीटिंग जागा सोडून इतर जागांबाबत चर्चा होणार असून, जागा कोणत्याही पक्षाकडे असली जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा याबाबत चर्चा होईल.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना सकाळी माध्यमांनी मुख्यमंत्री पदाबाबत, “तुम्ही मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले असल्याने तुम्हीच येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का..?” असा प्रश्न केला असता,”हा प्रश्न इतर पक्षांना (काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी) यांना विचारा, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले. परंतु आता समोर आळलेय माहितीनुसार तेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील हे जवळपास निश्चित झाल्याचे समजते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here