Nashik crime | देवळ्यात ट्रकटर ट्रॉलीला आग; २ ट्रॉली चारा जाळून खाक

0
49

Nashik crime | देवळा येथे सौंदाणे रोडवरील धोबीघाट जवळ चारा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीवर ठिणगी पडल्याने दोन ट्रॉली चारा जळून खाक झाला. दरम्यान, आग विझविण्यासाठी देवळा नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडी उशिरा आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत आलेली अग्निशमन दलाची गाडी परत पाठवली.

यंदा देवळा तालुक्यासह संपूर्ण कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती असल्याने पशुपालक आणि शेतकरी सर्वत्र जनावरांसाठी चाऱ्याच्या शोधात आहेत. मालेगाव तालुक्यातील एरंडगाव येथील संदीप देवरे हे रविवारी (दि .५) रोजी संध्याकाळी कळवण तालुक्यातील पिळकोस येथून दोन ट्रॉली चारा घेऊन एरंडगावला जात असताना देवळा-सौंदाणे रस्त्यावरील धोबीघाट या परिसरात कुणीतरी दुचाकीवरून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने चाऱ्याच्या मागच्या ट्रॉलीवर ठिणगी टाकल्याने चाऱ्याने अचानक पेट घेतला.

देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार तर उपनगराध्यक्ष पदी मनोज राजाराम आहेर बिनविरोध

मागून येणाऱ्या गाडीने सांगितल्यावर ट्रॅक्टर चालकाने समय सुचकता दाखवत ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला पाण्याच्या ठिकाणी लावला आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, आग आटोक्यात येत नसल्याने  या ठिकाणी दोन जेसीबी बोलवून चारा ट्रॉली वरून खाली खेचण्यात आला. त्यामुळे सुदैवाने ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या सुखरूप बाहेर काढण्यात आल्या. पण, आगीत संपूर्ण चारा मात्र जागीच जळून खाक झाला.

अग्निशामक बंब उशिरा आल्याने संताप

ह्या घटनेबाबत देवळा येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला संपर्क केला असता, अग्निशामक बंब हा उशिरा आल्याने सदर अग्निशामक बंबाला स्थानिकांनी विरोध करीत तो आलेला बंब पुन्हा माघारी पाठवून दिला.

देवळा | मेशी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उबाठा) तालुका प्रमुख बापू जाधव विजयी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here