Skip to content

आजचे राशी भविष्य रविवार; बघा कसे होताय बदल


कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग – पांढरा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – निळा.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग – पिवळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. शुभ रंग – लाल.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पांढरा.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. कार्यालयात वातावरण चांगले असेल. शुभ रंग – हिरवा.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. शुभ रंग – केशरी.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यात लाभ होईल. शुभ रंग – लाल.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल. शुभ रंग – पांढरा.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. नव्या कामाची सुरूवात करण्यास दिवस चांगला आहे. शुभ रंग – निळा.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. शुभ रंग – निळा.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. शुभ रंग – पिवळा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!