Maharashtra politics | राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली आणि राज्याचं राजकारण पुरतं ढवळून निघालं. अजित पवारांनी मोठ्या पवारांची साथ सोडली आणि शिवसेना (शिंदे गट) व भाजपसोबत एकत्र येऊन सत्तेत सामील झाले.
अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांसह अजित दादांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार असा प्रचार सुरू केला व आता राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न आता थेट निवडणूक आयोगाच्या न्यायालयात पोहोचला आहे. याच प्रकरणी आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोग तोडगा काढणार आणि थेट निकाल देणार की, पुन्हा तारीख पे तारीख देणार? हे बघणं औतत्सुक्याचे असणार आहे.
Weather update | हिवाळा नाही पावसाळा; वादळ वाऱ्यासह तूफान पावसाची शक्यता
आणखी एका चिन्हाची लढाई
शिवसेनेतील धनुष्यबाणाच्या लढाईनंतर आता राष्ट्रवादीच्या घड्याळाची लढाई निवडणूक आयोगात सुरू आहे. आधी शिवसेना कुणाची यावर घमासान झालं होतं. आता राष्ट्रवादी यावर सुरू आहे. २ जुलैला अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी ६ ऑक्टोबर ही पहिली तारीख देण्यात आली होती.
पक्षात फूट आहे की नाही? याचा फैसला करत निवडणूक आयोगाला आता हा निर्णय घ्यायचा आहे. शरद पवार गटाचा असा दावा आहे की, पक्षात फूटच नाही, आमचा पक्ष एकच आहे. पक्षाची घटना, आमदार- खासदारांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या या गोष्टी तपासून आता निवडणूक आयोगाने निर्णय घेणं अपेक्षित आहे. अनेकदा अंतिम निर्णयाआधी तात्पुरता निर्णय म्हणून चिन्ह गोठवत असतं. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या घड्याळाबाबत काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Nashik News | सिविल हॉस्पिटलचा अजब कारभार; जिवंत महिलेस केलं मृत घोषित
शिवसेनेप्रमाणे पवार गटाकडून ८ ते ९ हजार कागदपत्रं सादर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कागदपत्रावरूनही अजित पवार गटापेक्षा जास्त कागदपत्रं असल्याचा दावा मोठ्या पवारांच्या गटाकडून करण्यात येत आहे. पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगासमोर बाजू मांडली. आजच्या सुनावणीत काय होणार, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
घड्याळाच्या लढाईचा घटनाक्रम
- २ जुलै रोजी अजित पवार व सोबतच्या आमदारांचा शपथविधी
- शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगात ५ जुलै रोजी कॅव्हिएट दाखल
- अजित पवार गटाने ३० जून रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड केल्याचा दावा, ४० आमदार आपल्या बाजूने असल्याचा दावा
- निवडणूक आयोगानं त्यावर दोन्ही बाजूंना नोटीस पाठवत ८ सप्टेंबर पर्यंत आपली बाजू मांडण्याचे निर्देश
- दोन्ही बाजूची कागदपत्रं पाहिल्यानंतर आयोगानं आता या सुनावणीसाठी ६ ऑक्टोबर तारीख निश्चित केली
- Maratha Reservation | नाशिक जिल्ह्यात सापडल्या आठ हजार मराठा-कुणबी नोंदी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम