Spiritual news | ज्योतिषशास्त्रानुसार, शनि भगवान ही न्यायाची देवता आहे. शनिदेव हे कर्मफळ देणारे आहेत. वैदिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत त्यांचे शुभ स्थान असते, त्यांना समस्या व त्रासांपासून मुक्ती मिळते.
शनिदेव हे नेहमी अशुभच फळ देतात असे नाही, शुभ फळ देण्यासाठी ते धन, सुख, शांती व आदरही प्रदान करतात. शनिदेवाला प्रिय असलेली ही भाग्यशाली राशी कोणती व या राशीच्या लोकांवर शनिदेव आपल्या आशीर्वादाचा कसा वर्षाव करतात? हे जाणून घेऊयात…
शनि शुभ स्थितीत असेल तर…
कुंडलीतील शुभ स्थानी असलेले शनि हे व्यक्तीला उच्च स्थान प्रदान करतात. आणि शुभ स्थानी नसल्यास शनीची साडेसाती आणि शनि ढैय्या त्रासदायक असते. अशा स्थितीत त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रात शनीची हालचाल सर्वात मंद असल्याचेही सांगितले आहे.
म्हणून माणसाच्या आयुष्यात चांगल्या तसेच वाईट गोष्टी जास्त काळ टिकत असतात. सर्वच राशींवर शनिदेवाचा प्रभाव असतो. पण, काही अशा राशीही आहेत ज्यांच्यावर शनिदेवाचे विशेष प्रेम असते.
Gold-Silver Price | आनंदवार्ता..! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर
शनिदेवाची आवडती राशी
शनिदेवाचे तूळ ह्या राशीवर सर्वाधिक प्रेम आहे. तूळ राशीसाठी शनिदेव हे श्रेष्ठ मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणतीही राशी जेव्हा त्याच्या उच्च राशीमध्ये असते तेव्हा ते खूप शुभ परिणाम देत असतात. तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीत इतर ग्रहांची स्थिती खराब असल्याशिवाय साडेसाती किंवा शनि ढैय्याचा त्रास हा होत नाही.
या तूळ राशीच्या लोकांच्या यशाच्या वाटचालीत शनिदेव विशेष योगदान देतात. शनिदेव हे तूळ राशीच्या लोकांच्या प्रगती व समृद्धीमध्ये त्यांना मदत करतात. शनिदेवाच्या आशीर्वादाने, तूळ राशीचे लोक संक्रमण ग्रहाच्या वाईट नजरेपासूनही सुरक्षित असतात व जीवनात आनंद, कीर्ती तसेच सन्मान प्राप्त करतात.
शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय
दरम्यान, ह्या तूळ राशीच्या लोकांनी गरिबांना काळ्या रंगाचे ब्लँकेट, छत्री व धान्यांचे दान करावे. याशिवाय, मोहरीच्या तेलात चेहरा बघून छाया दान करणे हेदेखील फायदेशीर ठरेल. दर शनिवारी यांनी पिंपळाच्या झाडाच्या खाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा व शनि चालिसाचे पठण करावे.
(टीप – वरील सर्व बाबी ‘द पॉइंट नाऊ’ हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून द पॉइंट नाऊ दावा करत नाही.)
Nashik news | आता रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम