धुळे | शहरात शिवमहापुराण कथेत लाखोंच्या संख्येने भाविकांच्या गर्दीत संधीचा फायदा घेत हातसफाई करणाऱ्या 3 पाकीटमार चोरांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्या ताब्यातून पाकीटे तसेच मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. धुळ्यातील सुरत बायपास जवळील रस्त्यालगत ख्यातनाम शिवमहापुराण कथावाचक पं. प्रदिप मिश्रा यांचे दिनांक 15 नोव्हेंबरपासून कथावाचन कार्यक्रम सुरु आहे. शिवमहापुराण कथेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला असून लाखोंच्या संखेने भाविक येथे दाखल झाले आहेत.
Diwali 2023 | तयार फराळ विक्रीतून बाजारपेठेत चैतन्य! कसमादे पट्ट्यात झाली मोठी उलाढाल
गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ व पाकीटमारी होण्याची शक्यता असल्याने याबाबत संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक धुळे आणि किशोर काळे, अप्पर पोलिस अधीक्षक धुळे यांनी दत्तात्रय शिंदे पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केलेले होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साध्या वेशात गर्दीत स्वत उपस्थित राहुन संशयितांचा शोध घेत असतांना धुळे, मालेगाव आणि भुसावळ येथील तीन पाकीटमार मिळून आलेले आहेत. धुळे पोलिसांच्या पथकाने पाकीटमार चोरट्यांकडुन चोरी केलेली पाकीटं हस्तगत केले असून त्यांचे इतर साथीदारांकडून इतर पाकीटे आणि मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
Deola | देवळा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा
सिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे, चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या संशयित महिलांना विचारपुस करण्यात येते आहे. शिवमहापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी त्यांच्या किंमती वस्तू चोरी होणार नाहीत, याची काळजी घेणेबाबत धुळे पोलिस प्रशासणातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम