Malegaon | नाशिकच्या मालेगाव शहरात सलमान खानच्या चालू शो दरम्यान भरगच्च थिएटरमध्ये फटाके फोडले होते. मालेगाव शहरातील एका थिएटरमध्ये बॉलीवुड अभिनेता सलमान खान याचा चित्रपट सुरू असताना, हुल्लडबाज चाहत्यांनी चक्क थिएटरमध्ये फटाके फोडले.
या प्रकरणी, आता थिएटर मालकाने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. यानंतर छावणी पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळी शहरातील मोहन सिनेमागृहात फटाके फोडल्याचा हा प्रकार समोर आला होता.
अभिनेता सलमान खान व अभिनेत्री कतरिना कैफ यांचा टायगर-३ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला असून, पहिल्याच दिवशी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. देशभरात भाईजानचे चाहते असल्याने ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, भाईजानच्या अतिउत्साही चाहत्यांनी मालेगावच्या एका थिएटर मध्ये शाहरुख खानची एंट्री होताच कल्ला केला आणि धडाधड फटाके फोडले. पण, हे प्रकरण आता ह्या अतिउत्साही चाहत्यांच्या चांगलंच अंगलट आलं असून, थिएटर मालकाने थेट याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.
Nashik News | नाशिक विकायचं आहे! सोशल मीडियावर पोस्ट झाली व्हायरल
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सिनेमा सुरु झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानची एंट्री झाली. एंट्री झाल्यावर लागलीच प्रेक्षकांनी फटाके फोडायला सुरुवात केली. हा सगळा अंधाधुंद प्रकार पाहून इतर प्रेक्षकांचे धाबे दणाणले. अख्ख्या थिएटरमध्ये फटाकेच फटाके दिसू लागले. यानंतर काही मिनिटातच थिएटर मालकाने शो थांबवला. फटाके फोडल्यामुळे थिएटरचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी, मोहन चित्रपटगृहाच्या मालकाने मालेगावच्या छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मालेगावमध्ये सिनेमागृहात फटाके व आतिषबाजी करण्याचा प्रकार घडला आहे. शहरातील मोहन थिएटरमध्ये सुरू असलेल्या सलमान खानच्या ‘टायगर-३’ ह्या चित्रपटाच्या शो वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सलमान खानच्या ह्या हुल्लडबाज चाहत्यांनी चक्क चित्रपटगृहातच जोरदार फाटके फोडून कल्ला केला. या प्रकारामुळे सिनेमागृहातील इतर प्रेक्षक चांगलेच घाबरले होते. दरम्यान, मालेगावमध्ये चित्रपट गृहात फटाके फोडण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने या हुल्लडबाज चाहत्यांना आळा घालण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे.
Maratha Reservation | जरांगेंची तोफ नाशकात धडाडणार; सर्वपक्षीय नेतेही एकत्र येणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम