Deola| कांदा उत्पादकांचं वादळ मंत्रालयावर धडाडणार

0
20

Deola| कृषिप्रधान देशात शेतकरी महत्वाचा आहे. मात्र याच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम तत्कालीन सरकारने पद्धतशीर केले आहे. देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पिके घेणारा शेतकरी आजही ताठ मानेने उभा आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा बळी ठरलेला शेतकरी नेहमीच परिस्थितीशी लढत असतो. सर्व्याना संघटना आहेत मात्र शेतकऱ्यांना संघटना आजही दिसत नाही. शरद जोशी अपवाद सोडले तर शेतकरी संघटित कुणालाच करता आला नाही. पर्यायाने शेतकरीच कधी संघटित झाला नाही. तो विभागला गेला आणि याचा फायदा राजकारण्यांनी घेतला. शेतकरी वेळोवेळी मोर्चा काढतो मात्र न्याय मिळतो का हा संशोधनाचा भाग आहे. आता पुन्हा देवळा तालुक्यातील काही शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत…

स्व. निवॄती काका देवरे कॄषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथे आज शुक्रवार (दि. ३ नोव्हेंबर) रोजी नोटबंदी काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पैसा हा गेल्या ५ ते ६ वर्षांपासून मिळाला नाही. तरी ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावे. यासाठी मंगळवार (दि. ०५ डिसेंबर) रोजी मंत्रालय मुंबई येथे “दे धडक बेधडक अन्नत्याग आंदोलन” व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, याबाबतचे निवेदन देवळा तालुक्याचे तहसीलदार आणि देवळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय देवळा यांना देण्यात आले आहे.

कोकणगाव येथे मराठा समाजाचा साखळी उपोषणाचा एल्गार
दरम्यान, हे निवेदन देताना ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर, भ्रष्टाचार निर्मूलन संघटन देवळा तालुक्याचे अध्यक्ष आकाश थोरात, उपतालुकाध्यक्ष स्वप्निल पगार, शेतकरी तुकाराम जाधव, जिभाऊ देवरे, अशोक जाधव,  पंढरीनाथ कुंभार्डे, शरद जाधव, बाजीराव सोनवणे, मोठाभाऊ बच्छाव, निंबा अहिरराव, सुदाम अहिरराव व आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

ह्या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलन संघटन देवळा तालुकाध्यक्ष आकाश थोरात तथा उपतालुकाध्यक्ष स्वप्निल पगार यांनी पाठिंबा दिला आहे.

Nashik news | शेतकऱ्याची करामत..! बाहेर तूर आणि आत गांजा

नोटबंदी काळापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे अडकून आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत सर्वांना निवेदने पाठवण्यात आली आहेत. पण त्यावर कोणीच काहीही पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना घेऊन मी मुंबई मंत्रालय येथे आमरण उपोषण करणार आहे.

संजय दहिवडकर (ग्रामविकास समिती)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here