Crime news | सटाणा येथील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुलाई या ट्रेडिंग कंपनीचा पाच लाखांचा कांद्याचा माल भरलेला ट्रक घेऊन चालक फरार झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संबंधित ट्रक चालकाविरुद्ध जायखेडा पोलिस ठाण्यात ट्रक लंपास केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाहनाविषयी माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्याचे, आवाहनही सुलाई ट्रेडिंग कंपनीचे संचालक मनोज पोपट येवला यांनी केले आहे.
नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुलाई ट्रेडिंग कंपनीच्या नावाने मनोज येवला हे कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून विविध राज्यात तो माल पोचवतात. नेहमीप्रमाणे, शुक्रवारी (दि. १७) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नामपूर येथून अहमदाबाद येथील बाजार समितीत ट्रक (जीजे ०१ बीव्ही १३९५) यामध्ये १७ टन कांदा भरून पाठवलेला होता.
Nashik news | नाशकात जरांगेंची तोफ कडाडणार..! १०१ एकरांवर मराठ्यांची सभा
दरम्यान, हा ट्रक दुसऱ्या दिवशी दुपारी बारापर्यंत अहमदाबादला पोहचणे अपेक्षित होते. पण, ट्रक संध्याकाळपर्यंतही पोचला नव्हता. या ट्रकचा चालक दिनेश तडवी याला मोबाईलवरुन दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संबंधित ट्रकचालक हा फोन उचलत नव्हता.
संबंधित ट्रक हा मालेगाव येथील मंगलदीप ट्रान्स्पोर्ट येथून भाडेतत्त्वावर आणलेला होता. ट्रान्स्पोर्ट मालक मनोज महाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गाडीचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
या गाडीचा तपास लागत नसल्याने मनोज येवला यांनी संबंधित ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल केला असून, जायखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय वाघमारे, कॉन्स्टेबल भामरे, तसेच बरगळ हे गुन्ह्याच्या तपासासाठी रवाना झाले आहेत.
Mumbai | ED पासून वाचण्यासाठी सत्तेत गेले भुजबळ; अंजली दमानिया यांचे प्रत्युत्तर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम