Burning truck : सिन्नर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांचा सत्र वाढले आहे. यातच आता सोमवारी दुपारच्या सुमारास सिन्नरकरांनी द बर्निंग ट्रकचा थरार अनुभवला आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ एका धावत्या ट्रकने अचानकपणे पेट घेतल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिर्डी कडून सिन्नर कडे एक आयशर ट्रक निघाला होता. हा ट्रक सिन्नर कडे जात असताना पाथरे गावाजवळ अचानकपणे पेट घेतला. बघताक्षणी हा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने क्षणातच ट्रकची पुढील बाजू पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचं ट्रक चालकाकडून सांगण्यात आलं असून आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केल्याने कोणतीही दुर्घटना किंवा जीवित हानी झाली नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे चे टोल नाक्यावरील अपत्कालीन यंत्रणेचे सुपरवायझर प्रशांत शिंदे आणि सहकारी दुर्गेश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला बोलवत तात्काळ ही आग विझवण्यात आली या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम