Skip to content

शिवसेनेत अजून एका शिंदे समर्थक नेत्याची भर; पक्षाच्या प्रमुख नेत्याचा पदाचा राजीनामा


द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेनेला सुरू असलेल्या राजकीय गदारोळात अजून एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाणे येथील जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांद्वारे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ अनेकांनी प्रदर्शन केले. आता ठाणे येथील जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देतांना गेले अडीच वर्ष आपल्या संघटनेची राष्ट्रवादी गळचेपी सुरू आहे. त्याचा निषेध म्हणून राजीनामा देत असल्याचे सांगितले.

शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षातील खदखद स्पष्ट दिसून आली. ती शिंदे गटाने बोलून दखवतच वेगळा मार्ग निवडला आहे. आणि आता म्हस्के यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना पक्षातील नाराजी नाट्य सुरू झाल्याचेच दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे आणि शिवसेना हा वाद आता कायदेशीर वळणावर जाऊन पोहोचला आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. म्हस्के यांच्या या राजीनाम्यानंतर हे नाराजीनाट्य अजून पुढे काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!