ठाकरेंच्या शिवसेनेच्या नव्या चिन्हाचे शिवसैनिकांकडून स्वागत

0
19

नाशिक : केंद्रीय निवडणुक आयाेगाने उद्धव ठाकरे यांच्या “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” पक्षाला “मशाल’’ हे चिन्ह देण्यात आल्यानंतर शहरातील हजारो शिवसैनिकांनी एकत्र येत नव्या चिन्हाचे स्वागत केले.

गत शनिवारी आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह व नाव गोठावल्यानंतर ठाकरे गटाने लगेच तीन पर्यायी चिन्हे सुचवली होती. त्यावर सोमवारी निर्णय घेत ठाकरे गटाला मशाल चिन्ह देत “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” असे नाव त्यांना देण्यात आले. दरम्यान, या नव्या चिन्हाची घोषणा होताच राज्यभरातील अनेक शिवसैनिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. नाशिकमध्येही याचा जल्लोष व स्वागत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

मंगळवारी (दि. ११) शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हजारो शिवसैनिकांनी एकत्र जमत पेटत्या मशाली हातात घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी संबळच्या तालावर हजारो कार्यकर्ते हातात मशाल घेऊन नाचले होते व शिवसेनेच्या घोषणा दिल्यात. तसेच हजारो शिवसैनिकांनी शिंदे गटात गेलेल्या मंत्री, खासदार, आमदारांसह अन्य पदाधिकार्‍यांचा निषेध करत गद्दारांना पाडण्यासाठी मशाली पेटवा, असे रणशिंग फुंकण्यात आले आहे.

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना धनुष्यबाण गोठवण्यासोबतच मशाल निशाणी मिळाल्यानंतर शिवसैनिक पेटून उठलेला आहे. त्याचा प्रत्यय येत्या मनपा निवडणूकीत विरोधकांना दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी उपनेते सुनिल बागुल, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्क नेते दत्ताजी गायकवाड, अजय बोरस्ते, डीजी सुर्यवंशी, योगेश घोलप, सूर्यकांत लवटे, मधुकर जाधव, भागवत आरोटे, बाळा कोकणे, देवा जाधव, गोकूळ निगळ, प्रेम पाटील, शोभा मगर, किर्ती जावखेडकर, श्रध्दा दुसाने, सविता गायकर, हेमलता कांडेकर, नयना गांगुर्डे, राहुल बर्वे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here