राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे २६ जानेवारी ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महर्षी वाल्मिकी, आश्रम शाळा, सिम्बॉल ऑफ नॉलेज इंग्लिश मिडीयम स्कूल आदीसह गावातील सर्वच अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजता ढोल ताश्यांच्या गजरात भारत माता की जय,जय जवान जय किसान च्या जयघोषात प्रभात फेरी रॅली काढली यात जवळपास अंदाजे तीन हजार विद्यार्थी सामील होते.
त्यानंतर जि प शाळा, ग्रामपंचायत कार्यालय,पोस्ट ऑफिस व त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज टाकेद येथील ध्वजारोहण टाकेद व पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आरोग्य सेविका कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी,तलाठी,वायरमन सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी,सर्व ग्रामस्थ जेष्ठ नागरिक आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी हजारो विद्यार्थी रसिक प्रेक्षक ग्रामस्थ नागरिक यांच्या उपस्थितीत टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांचे एकून जवळपास चाळीस सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य सादर झाले.या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते,छत्रपती शिवरायांच्या अफजल खानाचा वध याने सर्वांचे लक्ष्य वेधले, त्यानंतर कोळी गीत, मराठी गीते, खंडोबाची कारभारीन, ओ देश मेरे, स्केम इंग्लिश मिडीयम स्कूल च्या ज्युनिअर के जि चे विद्यार्थी झुंबर पाडा, देशभक्तीपर गाण्यावर थिरकले, अश्या गाण्यातील नृत्यविष्काराने सर्वांची मने जिंखली न्यू इंग्लिश मीडियम स्कूल च्या वतीने प्राचार्य तुकाराम साबळे यांच्या मार्गदशनखाली सर्व वर्ग शिक्षकांनी मेहनत घेऊन हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला गावच्या प्रथम नागरिक सौ ताराबाई रतन बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई शिंदे,लता लहामटे, कविता धोंगडे,भामाबाई धादवड, उद्योजक नंदू जाधव, जेष्ठ नागरिक आबाजी बारे,पोलीस पाटील प्रभाकर गायकवाड,भास्कर महाले, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, अशोक महाले, प्राचार्य तुकाराम साबळे,मुख्याध्यापक नवनाथ आढाव, उप प्राचार्य पाटील आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ, शिक्षक वृंद कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन चौधरी, चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम साबळे यांनी केले. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साउंड सिस्टीम साठी डी जे विजय बांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इकोफ्रेंडली आदर्शवत गाव याचे लक्ष्यवेधी प्रतिकृती प्रदर्शन मांडण्यात आले
आजच्या धकाधकीच्या आधुनिक जमान्यात निसर्गाच्या सानिध्यात एक आदर्श eco friendly सर्व सुविधांनी परिपूर्ण असे आदर्श गाव हे ज्युनिअर कोलेज चे शिक्षक संदीप ढोरकुले यांच्या संकल्पनेतून यात ,स्वच्छ नदी,धरण, घरांची आदर्श रचना,स्वच्छ व रुंद रस्ते,घर तेथे शौचालय,वीज पुरवठा करण्यासाठी पवन चक्की पवन ऊर्जा प्लांट,जलविद्युत प्रकल्प,वाय फाय टॉवर, डिजिटल शाळा, सुसज्ज आरोग्य केंद्र, वृक्षारोपण ,पार्किंग ट्रेक,प्ले ग्राउंड,फिल्टरेशन आर ओ पाणी,रेल्वे ट्रेक बोगदा पूल, पाण्याची टाकी, मंदिर, आरोग्य केंद्र, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, जल विद्युत प्रकल्प, कडवा नदी, ग्रामपंचायत ,तलाठी कार्यालय सर्व शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, उद्यान, विहीर, वटवृक्ष, स्वच्छ गाव, अभ्यासिका, इत्यादीं बाबींनी आदर्शवत बनवलेले एक सुंदर आदर्शवत भावी रोल मॉडेल टाकेद गाव हे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक या प्रोजेक्ट चे मुख्य शिक्षक संदीप ढोरकुले यांच्या सहाय्यक साबळे एस आर, रमेश शिंदे, ११ वि व १२ वीचे सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम