Deola | देवळ्याच्या पश्चिम भागातील जनतेचे पाणी प्रश्न मार्गी लवण्याबाबत आमदारांना निवेदन

0
33

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मांजरपाडा २ आणि नारपार योजनेचे पाणी तालुक्यातील पश्चिम भागातील शेरी वार्शी धरणात टाकण्यात यावे, या मागणीचे निवेदन स्थानिक शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. ७) रोजी आमदार डॉ. राहुल आहेर यांना दिले.

निवेदनाचा आशय असा, देवळा तालुक्यात दरवर्षी अत्यल्प पर्जन्यवृष्टी होत असल्याने येथील नगरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना चणकापूर उजव्या व गिरणा डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात येते. चणकापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा त्यांना लाभ होतो.

Nashik Crime | चांदवडच्या कांदा व्यापाऱ्याला 15 लाखांचा गंडा

पण, पश्चिम भागातील खर्डे, हनुमंतपाडा, शेरी, वार्शी, कनकापूर, काचणे हा परिसर लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे पाण्यापासून वंचित आहे. ह्या वर्षी तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले, छोटे मोठे पाझर तलाव कोरडी पडली आहेत. यामुळे खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असून, जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचीही पशुपालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. या भागासाठी मांजरपाडा २ किंवा नारपार प्रकल्पाच्या माध्यमातून मध्यंतरी सर्वे झालेला आहे.

प्रत्येक निवडणुकीत लोकप्रिनिधी आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याचा आरोप, उभा भागातील नागरिकांनी केला असून, २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत जो लोकप्रतिनिधी या भागातील पाणी प्रश्न मार्गी लावेल त्यालाच मतदान करण्याचा निर्णय तालुक्यातील दुष्कळी भागातील जनतेने घेतला आहे.

Nashik News | सोग्रस येथे ट्रॅक्टर आणि कंटेनरचा भीषण कंटेनरचा

दरम्यान मंगळवारी (दि. ७) खर्डे परिसरातील पाण्यापासून वंचित असलेल्या शिष्टमंडळाने देवळा-चांदवडचे आ. डॉ. राहुल आहेर यांची भेट घेऊन मांजरपाडा २ आणि नारपारचे पाणी बोगद्याच्या माध्यमातून शेरी धरणात टाकावे अशा मागणीचे निवेदन दिले. यावेळी आमदार डॉ. आहेर यांनी शिष्ट मंडळाला याकामी आपण लवकर संबंधित अधिकाऱ्यांची  बैठक घेऊ व पाण्याचा प्रश्न मार्गी लाऊ असे आश्वासन दिले आहे.

या निवेदनावर शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा संघटक नंदु जाधव, विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव, शरद पवार, प्रहारचे माधव ठोंबरे, युवा जिल्हाध्यक्ष बापू देवरे, शशिकांत पवार, रमेश भदाणे, काशिनाथ गांगुर्डे, दत्तू मोरे, भारत जगताप, राजेंद्र केदारे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

pandharpur | मराठ्यांच्या एल्गारला पंढरपूर समितीचा पाठिंबा; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान नाही


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here