आषाढी एकादशीला पंढरपूरला दर्शनाकरिता जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे प्रवाशांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने पंढरपूर आषाढी एकादशी विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचा उत्साह राज्यभरात मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहे. राज्यातील ठिकठिकाणा होऊन पायी वारी देखील पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यातच सर्वसामान्य नागरिकांना देखील पंढरपूरला जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आल आहे. यात त्यामध्ये भुसावळ-पंढरपूरसह, नागपूर-मीरज, नागपूर-पंढरपूर, अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मीरज-पंढरपूर, मीरज-खुर्दूवाडी या आषाढी एकादशी विशेष गाड्यांचा समावेश आहे.
भुसावळ-पंढरपूर गाडीच्या 28 जूनला दोन फेर्या होतील. जळगाव, भुसावळ, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी ही गाडी थांबेल. नागपूर-मीरज गाडीच्या 25 आणि 28 जूनला चार फेर्या होतील. ही गाडी जळगाव, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव व अन्य स्थानाकांवर थांबेल. नागपूर-पंढरपूर आणि नवी अमरावती-पंढरपूर या दोन्ही गाड्यांच्या 26 आणि 29 जूनला चार फेर्या होतील. भुसावळ, चाळीसगावसह मनमाड, कोपरगाव आदी स्थानकांवर या गाड्या थांबतील. खामगाव-पंढरपूर या गाडीच्या 26 आणि 29 जूनला चार फेर्या होतील. ही गाडी भुसावळ, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड आदी ठिकाणी थांबेल.
देशात विविध यात्रा तसेच तीर्थस्थळाच्या उत्सवात रेल्वे प्रशासन विशेष गाड्या सोडत असतात. महाराष्ट्रातही आषाढी एकादशीला हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. विदर्भातून त्यासाठी रेल्वेचा पर्याय आहे. यासाठी आता विदर्भातील पांडुरंगाच्या भाविकांसाठी देखील आषाढी एकादशी निमित्त तीन खास गाड्या धावणार आहेत.
खासदार अनिल बोंडे यांनी केली होती मागणी : विदर्भातील पंढरीच्या भक्तांसाठी आषाढी एकादशीनिमित्त नागपूर, अमरावती तसेच खामगाव येथून तीन स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी विनंती खासदार अनिल बोंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे केली होती. खासदार अनिल बोंडे यांनी केलेली विनंती रेल्वेमंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री दोघांनीही तातडीने मान्य केली असून, विदर्भातील पांडुरंगाच्या भाविकांसाठी आषाढी एकादशी निमित्त तीन खास गाड्या आता धावणार आहेत.
25 ला धावणार स्पेशल ट्रेन: नागपूर, खामगाव रेल्वे स्थानकासह अमरावतीच्या नया अमरावती या रेल्वेस्थानकावरून 25 जूनला गाड्या पंढरपूरसाठी धावणार आहेत. 26 जूनला देखील या तिन्ही रेल्वे स्थानकावरून या स्पेशल गाड्या सुटतील. या स्पेशल गाडीद्वारे भाविक 28 जूनला पंढरपूरला पोहोचतील. विदर्भातील पंढरीच्या भाविकांसाठी ही स्पेशल ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्ण, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार अनिल बोंडे मानले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम