Somvar pooja | दर सोमवारी ‘हे’ उपाय केल्यास अनेक समस्या होतील दूर

0
12
Somvar pooja
Somvar pooja

Somvar pooja |  हिंदू धर्मानुसार, आठवड्यातील प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित असतो. यानुसार सोमवारचा दिवस हा भगवान शिवाला समर्पित आहे. यामुळेच या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार, सोमवारी महादेवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र हा बलवान असतो. आणि चंद्र बलवान असल्यास घरात आनंदाचे वातावरण असते तसेच व सुख शांती नांदते. दरम्यान, पौराणिक कथांनुसार सोमवारी काही खास उपाय सांगण्यात आले आहे. ज्याचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतील. (Somvar pooja)

तसेच ह्या उपायांमुळे संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होईल आणि जीवनात आनंद बहरतो. सोमवार हा शंकराचा वार असून, ह्या दिवशी भगवान शंकराचे विधीवत पूजन केल्याने विशेष लाभ होऊ शकतो. सोमवारी केलेले निश्चित उपाय तुमच्या आयुष्यातील समस्या संपवू शकतात. सोमवारसाठीचे उपाय जाणून घेऊयात.(Somvar pooja)

Shirdi | शिर्डीत ‘नो मास्क, नो एंट्री’; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

असे आहेत उपाय |(Somvar pooja)

१. घरात वडील मुलाचे किंवा सासू सुनेचे नेहमी वाद होत असतील तर, सोमवारी स्नान केल्यावर भगवान शंकराचे ध्यान आणि पूजन करा. त्यानंतर शीशमच्या वृक्षासमोर हात जोडून घरात सुख-शांती राहो यासाठी कामना करा. दरम्यान, दर सोमवारी हा उपाय केल्याने घरातील वाद दूर होतील आणि घरात सुख-शांती नांदते. (Somvar pooja)

२. पती पत्नीचे नेहमी वाद होत असतील किंवा वैवाहिक जीवनात काही विघ्न असतील तर, प्रत्येक सोमवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राक्ष दान करावे. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन हे आनंदी असते. याबरोबरच तुम्हाला काही आर्थिक संकटातूनही दिलासा मिळन्यास मदत होईल. (Somvar pooja)

३. तसेच सोमवारी स्नान केल्यानंतर मंदिरात जावे आणि शिवलिंगाचा विधीवत अभिषेक करावा. हा उपाय दर सोमवारी केल्याने भगवान शंकरांची तुमच्यावर विशेष कृपया होते आणि त्यांचे शुभ आशीर्वाद देतात. (Somvar pooja)

Datta Jayanti | पूर्वजांना मुक्त करणाऱ्या श्री दत्तांची आज जयंती; जाणून घ्या कथा

४. कुंडलीत एखादे अशुभ ग्रह असतील तर त्यापासून मुक्ती मिळावी यासाठी सोमवारी मंदिरात जावे आणि एखाद्या तांब्याच्या भांड्यात गंगाजल व काळे तीळ टाकून याचा शिवलिंगावर अभिषेक करावा. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्यामुळे कुंडलीतून शनिचा दोष दूर होतो.(Somvar pooja)

भगवान देवाधिदेव महादेवांचे पूजन करण्यासाठी सोमवारचा दिवस हा शुभ दिवस मानला जातो. कारण सोमवार हा शंकराला समर्पित असतो. दरम्यान, काही कर्जापासून मुक्ती तसेच सुख-समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर आगामी नव वर्षात दर सोमवारी हे उपाय निश्चित करावे.((Somvar pooja))

(टीप – वरील सर्व बाबी ह्या ‘द पॉइंट नाऊ’ हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असते. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here