स्नेहमेळावा निमित्ताने देवळ्यात ५४ वर्षांनी एकत्र आले वर्गमित्र

0
1
देवळा : तब्बल ५४ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेले माजी विद्यार्थी व गुरुजन (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा : येथील श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कुल च्या १९६८ मधील इयत्ता अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांचा ५४ वर्षांनंतरचा स्नेहमेळावा नुकताच विविध उपक्रमांनी संपन्न झाला. आमदार डॉ. राहुल आहेर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
जिल्ह्यात खतांचा तुटवडा थांबणार; पालकमंत्र्यांनकडून संबंधित कंपनींची कानउघाडणी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवृत्त प्राध्यापक डॉ.सी.डी. सावकार यांनी केले. यावेळी भाजपचे व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, कार्यकारी अभियंता पंकज मेतकर, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी चिंतामण शिरोडे, माजी सैनिक नंदू आहेर, गुरुवर्य एन.एन. शिरसाठ, उद्योजक अभिजित आडके, मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके उपस्थित होते. या वर्गात शिकलेले व नंतर विशेष कामगिरी बजावलेले तसेच राजकीय क्षेत्रात छाप पाडणारे, व्यवसायात प्रगती साधणारे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

देवळा : तब्बल ५४ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेले माजी विद्यार्थी व गुरुजन (छाया – सोमनाथ जगताप)

शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील खाेड्या, मस्करी, शिक्षकांकडून झालेल्या शिक्षा, व एकुणच यशस्वी पणे पुर्ण केलेले शालेय शिक्षण याबाबत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बाळासाहेब सोनजे, एन.डी. पाटील, शिवाजीराव भामरे, अशोक पवार, तारा मांडगे, राजाराम अहिरराव, या वर्गाला अध्यापन करणारे एन.एन.शिरसाठ यांनी मनोगते व्यक्त केली तर सुलोचना मेतकर यांनी कविता सादर करत गतस्मृतींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केदा आहेर यांनी पूर्वीची व आताची शिक्षणपद्धती यावर भाष्य केले. यावेळी उपस्थित या सर्व माजी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

सप्तशृंगी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच नाशिक मनपा स्थायी समितीचे माजी सभापती बाळासाहेब आहेर यांनी या मेळाव्याचे संयोजन केले. ५४ वर्षांनी एकत्र आल्याने जुन्या आठवणी व अनुभव अनेकांनी कथन करत वर्तमान परिस्थितीतील कौटुंबिक माहितीचे आदानप्रदान केले. अनेक वर्षांनी मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी नारायण पवार, जगन्नाथ निकम, माधवराव आहेर, कृष्णा बच्छाव, डी. एन.आहेर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनीही भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले. निवृत्त मुख्याध्यापक नंदकुमार खरोटे यांनी सूत्रसंचालन केले. तर निवृत्त प्राचार्य बाबाजी आहेर यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here