दिल्ली : आताची सर्वात मोठी व ब्रेकिंग बातमी ! निवडणूक आयोगाकडून शिंदे गट व ठाकरे गटाला नवे नाव व चिन्हे देण्यात आली आहेत.
शनिवारी आयोगाने शिवसेनेचं नाव व चिन्ह गोठावल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट ह्या दोघांना आगामी निवडणुकीकरता नवे नाव व चिन्हांचा पर्याय देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर नुकताच निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव देण्यात आले असून, तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव आयोगाने दिले आहे.
तसेच ठाकरे गटाला “मशाल” हे चिन्ह मिळाले असून शिंदे गटाने अद्यापही ३ पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव दिला नसल्याने त्यांना उद्या (दि. ११) सकाळपर्यंत पर्यायी चिन्हे देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या पर्यायी नावांवर आणि चिन्हांवर दोनही गटांनी दावा दिला होता. पण आयोगाने दोघांना वेगवेगळे नवे दिली आहेत.
शिंदे गटाने दिलेले चिन्हे ह्या कारणांनी बाद झालेत
दरम्यान, आज शिंदे गटानेही ‘गदा’, ‘त्रिशूळ’ व ‘उगवता सूर्य’ ही तीन पर्यायी चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. मात्र, शिंदे गटाने सुचवलेली तीनही चिन्हे आयोगाने बाद ठरवली आहे. कारण गटाने सुचवलेल्या तीन चिन्हांपैकी दोन चिन्हांवर आधीच आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली असून ‘गदा’ हे चिन्हे धार्मिक असल्यामुळे ते बाद ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आयोगाने शिंदे गटाला उद्या सकाळी १० वाजेपर्यंत नव्या पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच, ठाकरे गटालाही मशाल चिन्ह देण्यामागचे कारण समोर आले आहे. खरेतर, ठाकरे यांनी ‘त्रिशूल’ या चिन्हाची मागणी केली होती. पण हे धार्मिक चिन्ह असल्याने ते कोणालाच देता येत नाही. तसेच ‘उगवता सूर्य’ हे तामिळनाडूतील पक्षाचे चिन्ह असल्याने हेही चिन्ह बाद होत आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून ‘मशाल’ हे चिन्ह ठाकरेंना देण्यात आले आहे.
ठाकरे गटाचा नवा लोगो समोर
तर तिकडे ठाकरे गटाला नाव व चिन्ह मिळाल्याने त्यांनी लगेच आपला नवा लोगो सर्वासमोर आणला. ह्या नव्या लोगो मध्ये धगधगती मशाल घेतेलेला हात व खाली “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” असे नाव देण्यात आले आहे. हा नवा लोगो समोर येताच अनेकांनी हा लोगो आपल्या व्हाॅटसअप डीपीला ठेवला आहे. तसेच उस्मानाबादमध्ये मोठा जल्लोष साजर करण्यात आला असून यावेळी ठाकरे गटातील नेत्यांच्या हस्ते मशालीचे अनावरण करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम