Shivsena News | सुषमा अंधारे आज आमदार कांदेंच्या बालेकिल्ल्यात गरजणार

0
16
Shivsena News
Shivsena News

Shivsena News |  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची नाशिक मध्ये ‘महाप्रबोधन यात्रा’ ही सुरू होणार आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातील मनमाड येथे सुषमा अंधारे यांची सभा पार पडणार आहे. दरम्यान, ह्या सभेत सुषमा अंधारे ह्या सुहास कांदे यांचा कसा समाचार घेताय, हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आता कांदा निर्यातबंदीचा मुद्दा हा पेटलेला असून, संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कांदा लिलाव हे बंद ठेवण्यात आले आहेत. आता या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ‘महाप्रबोधन सभा’ ही होत आहे. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात प्रचंड संतप्त आहेत.

Onion News | भारती पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; शेतकऱ्यांची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील त्यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे आमदार सुहास कांदे आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच उद्धव ठाकरे गटात नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात जोरदार संघर्ष सुरू असून, आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांची राजकीय मोट बांधण्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठे राजकीय यश आलेले आहे. त्यामुळे आमदार कांदे आणि विरोधक यांच्यातील राजकीय वातावरण हे सध्या तापलेले आहे.

दरम्यान, आजच्या अंधारे यांच्या मानमाड येथील ह्या सभेमुळे आधीच पेटलेल्या संघर्षात काय भऱ पडते याची सर्वांनाच उत्सुकता आहे. महाप्रबोधन यात्रा ही आजपासून नाशिक जिल्हयात येणार आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या ग्रामीण मध्ये मनमाड येथे आणि शहरात देखील त्यांची सभा पार पडणार आहे. दरम्यान, ह्या यात्रेची तसेच सभेची जोरदार तयारी ही ठाकरे गटाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

Breaking | चांदवडमध्ये सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत ‘रास्ता रोको’

भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) यांच्या महायुती सरकारच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केलेली असून, शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश हे राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात ‘महाप्रबोधन यात्रा’ ही सुरू आहे.

दरम्यान, आता दुसऱ्या टप्यातील यात्रेला सुरुवात होत असून, ह्या महाप्रबोधन यात्रेच्या अंतर्गत संपूर्ण राज्यात तब्बल ४० सभांचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. मनमाडमधील ‘एकात्मता’ चौकात रविवार (दि. १०) रोजी ही जाहीर सभा पार पडणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here