ठाकरे गटाला मिळाले नवे चिन्ह, पण नाते आहेच जुने !

0
27

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठावल्यानंतर आज ठाकरे गटाला “मशाल” चिन्ह देण्यात आले आहे. भले हे चिन्ह आज देण्यात आले असले, तरी या चिन्हाचा आणि शिवसेनेचे फार जुने आहे. कारण, याच मशालीने शिवसेनेचा इतिहास घडला आहे.

ठाकरे गटाला आज मशाल हे चिन्ह देण्यात आले. पण शिवसेनेकडून ह्या चिन्हाचा वापर यापूर्वीही करण्यात आला होता. अन् विशेष म्हणजे, याच चिन्हाच्या जोरावर शिवसेनेचा पहिला आमदार व खासदार निवडून आला होता. इतकेच नव्हे, तर याच मशालीने मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणली होती. पाहूया हा इतिहास…

१९८९ – मोरेश्वर सावे

१९८९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यावेळेस त्यांची निशाणी मशाल होती. तेव्हा  बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर याच मशाल चिन्हावरच मते मागितली होती. विशेष म्हणजे सावे यांनी ह्याच चिन्हाच्या जोरावर विजय मिळवत शिवसेनेचा पहिला खासदार होण्याचा बहुमान मिळवला होता. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत (१९९८ चा अपवाद वगळता) औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा कायम फडकत राहिला होता.

१९८५ – छगन भुजबळ 

नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची मुंबई ही कर्मभूमी. छगन भुजबळ हे १९७२ पासून १९८५ पर्यंत मुंबईत नगरसेवक पदावर होते. १९८५ मध्ये बाळासाहेबांनी भुजबळांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी भुजबळ यांना मशाल चिन्ह देण्यात आले होते. अन् याच चिन्हावर छगन भुजबळ बहुमताने विजय मिळवत शिवसेनेचे एकमेव आमदार झाले.

मुंबई महापालिका निवडणूक

ज्यावर्षी छगन भुजबळ आमदार झाले होते, त्याचवर्षी भुजबळांच्याच नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचे ठरवले होते. त्याहीवेळी धगधगती मशाल हेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह होते. विशेष म्हणजे, या चिन्हावर शिवसेनेचे ७४ नगरसेवक निवडून आले व शिवसेनेची मुंबई महापालिकेत सत्ता आली.

या तीन ऐतिहासिक घटनांमुळे अनेक जुन्या शिवसैनिकांनी याच धगधगत्या मशालीने शिवसेनेचा इतिहास घडविला होता, असे भावना व्यक्त करत  हे मशाल चिन्ह पुन्हा आल्याने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण होऊन मोठी क्रांती होणार असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here