Unique Temple | भारतातील प्रत्येत गावात तुम्हाला वेवेगळी मंदिरं पहायला मिळतात. आपल्या भारतात अशी लाखो मंदिरं आहेत. त्यापैकी अनेक मंदिरे आहेत ज्यामागे अनेक रहस्य आहेत. काही मंदिरांमध्ये भक्तांना चमत्कारदेखील पाहायला मिळतात. आज आपण अशाच एका रहस्यमयी शिव मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत कारण या मंदिराची सुरक्षा बेडूक करतो आणि म्हणुनच याला बेडूक मंदिर म्हणून ओळखले जाते. (Unique Temple)
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील ओयल शहरात असलेले हे शिव मंदिर प्रचंड प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर मांडुक यंत्राच्या आधारे बांधलेले आहे तसेच बेडकाने या मंदिराचे रक्षण केल्यामुळे त्याला ‘बेडूक मंदिर’ असे नाव पडले. या मंदिराच्या रक्षणाची जबाबदारी 11 व्या शतकापासून चाहमना शासकांची होती आणि चाहमना घराण्यातील राजा बख्श सिंह यांनी हे मंदिर बांधलेले होते. हे मंदिर तंत्रविद्येच्या आधारे बांधले गेले असा समज आजही मानला जातो.
पौराणिक धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव या मंदिरात बेडकाच्या पाठीवर बसलेले आहेत आणि यावेळी बेडूक त्यांचे रक्षण करत असतो. हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे ज्यात भगवान शिवाचे रक्षण बेडूक करते आहे. त्यामुळे या मंदिराला विषेश असं महत्व आहे. या मंदिराविषयी अशीही श्रद्धा आहे की, जो भक्त भगवान शंकराची निर्मळ पूजा करतो, त्याच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होत असतात. तसेच या मंदिराबाबत अनेक कथा प्रचलीतदेखील आहेत. दिवाळीच्या दिवशी या मंदिरात विशेष पूजा केली जाते त्यामुळे दिवाळीला येथे भक्तांची गर्दी पहायला मिळते.
या मंदिराबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की, या मंदिरात बसवलेले शिवलिंग दिवसभरात अनेक वेळा रंग बदलत असते. या मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग नर्मदेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते. तसेच हे मंदिर बनवताना संगमरवरी दगड वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर या मंदिरात नंदीची मूर्ती उभ्या स्थितीत स्थापित करण्यात आलेली आहे. तंत्रशास्त्रानुसार बांधलेला मंदिराचे छत अशाप्रकारे बांधण्यात आले होते की पूर्वी ते सूर्यप्रकाशासोबत फिरत असे परंतु आता हे छत योग्य देखभालीअभावी खराब झाले आहे. (Unique Temple)
टीप – वरिल माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. यामध्ये केलेल्या दाव्यांचे The Point Now समर्थन करत नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम