Shirdi | देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशासह राज्यात कोरोना ओमिक्रॉन चा नवा व्हेरीअंट दाखल झाला असून, ह्या नव्या विषाणूच्याहि बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डी (Shirdi) साई बाबा मंदिरात मास्क बंधनकारक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी आत प्रवेश देऊ नये, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई बाबा संस्थानच्या प्रशासनाला दिल्या आहेत.
संपूर्ण जगभरातून भक्त शिर्डी येथे साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येतात. पण, आता कोरोनाच्या जेएन.1 ह्या नव्या विषाणूमुळे पुनः एकदा नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, राज्यातही कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहेत आणि यामुळे देशासह राज्यातील आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्या आहेत.
Nashik Corona | नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोनाचे तीन शिकार
नो मास्क, नो एंट्री |(Shirdi)
दरम्यान, शिर्डी येथे खबरदारीचे उपाय म्हणून शिर्डी साई बाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर प्रवेशद्वाराजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिलेल्या आहेत. या सूचनेची अंमलबजावणी ही बुधवारपासूनच केली जाणार असल्याने आता दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना तसेच गावातील ग्रामस्थांनाही मास्क घालूनच प्रवेश करणे बंधनकारक आहे.(Shirdi)
Corona Update | कोरोनाचा वाढता कहर; नवीन व्हॅरियंटने घेतला तिघांचा बळी
भारती पवारांच्या प्रशासनाला सूचना
कोरोनाच्या जेएन १ ह्या नव्या व्हेरीएंटचा केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा आणि आता महाराष्ट्रातही वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, या राज्यांत आता विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सुट्टी चे दिवस असल्याने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असल्यामुळे अधिक खबरदारीच्या सूचना ह्या आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. केरळ राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या ही अत्यधिक असल्याने तिथे याचा प्रसार वेगाने होत आहे. (Shirdi)
कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी घाऊन दिलेल्या नियमांचे पालन करण्यासोबतच कोविड चाचण्यादेखील वाढवण्यात आल्या आहेत. २२ जानेवारी २०२३ ला अयोध्या येथे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून, याठिकाणी लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. दरम्यान, ह्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी केल्या आहेत. (Shirdi)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम