Shirdi : शिर्डीत येणाऱ्या भाविकांची फसवणूक थांबणार….

0
37

Shirdi : श्री साईबाबांचे भक्तगण मोठ्या प्रमाणावर असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी नेहमीच भाविकांची गर्दी असते. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराला ओळखलं जातं. या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याचे काम मंदिर प्रशासन सातत्याने करत आहे. यात अनेकदा गर्दी मुळे भाविकांना दर्शन न घेताच माघारी परतावं लागत. हीच गैरसोय टळावी म्हणून भाविकांचे मंदिर प्रशासन अहोरात्र मेहनत घेत असते यामुळे भाविकांना साईबाबांचे दर्शन घेणे सुलभ झाले आहे. मात्र बाहेरून येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत असल्याच्या घटना काही कमी होत नाहीये यामुळे मंदिर पोलिसांनीही पावले उचलली आहे. शिर्डी पोलिसांनी यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 

शिर्डीला साईबाबा यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांची लूट होऊ नये, यासाठी शिर्डी पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे भाविकांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर गुन्हे दाखल झाले असून. साईमंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर निर्बंध आणण्यात आहे आहेत. सर्व व्यावसायिकांना प्रसाद आणि शालच्या किंमतीचे फलक दुकानावर लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त केलं जातं आहे. तसेच या निर्णयामुळे मंदिर परिसरात असणाऱ्या दलालांवर वचक बसणार आहे.

 

मागील काही महिन्यांमध्ये तब्बल 1000 जणांवर या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून कोणी छुप्या पद्धतीने भाविकांची फसवणूक करू नये यासाठी गुप्त पथके देखील मंदिर परिसरात दाखल असतात. याचबरोबर मंदिराच्या आवारात फिरणाऱ्या एजंटच्या प्रलोभनांना बळी पडू नये अस आवाहन देखील पोलिसांनी शिर्डीत दाखल होणाऱ्या भाविकांना केल आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here