मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बहुमत चाचणीत पास

0
17

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव १६४ मते मिळवून जिंकला. तर महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली, तीन आमदार तटस्थ राहिले.

राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज शेवटच्या दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला तर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी त्याला अनुमोदन दिले.

सुरुवातीला आवाजी मतदान झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली. शिंदे-भाजप सरकारने १६४ मतांसह बहुमताचा आकडा गाठला आणि विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडीला ९९ मते मिळाली. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर अनुपस्थित राहिले. त्यापैकी जितेश अंतापुरकर यांचे लग्न असल्यामुळे तर प्रणिती शिंदे ह्या परदेशात असल्याने अनुपस्थित राहिले.

१० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-भाजप सरकार अस्तित्वात आले. शिंदे-भाजप सरकारने आपल्याकडे बहुमत असून सहजपणे विश्वासदर्शक ठराव जिंकू असं म्हटलं होतं. त्यानुसार राज्यात शिंदे-फडणवीस सरकार राहणार हे स्पष्ट झाले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here