
देवळा ; शेतकरी संघटनेच्या देवळा तालुका अध्यक्ष पदी विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी माणिक निकम यांची नियुक्ती करण्यात आली. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांच्या हस्ते माणिक निकम यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले .

शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष ललीत बवाहळे यांच्या सूचनेनुसार आपली देवळा तालुका शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असून . आदरनिय शरद जोशी यांच्या विचारावर पुढील काळात संघटना मजबुतीने हुभी राहिल असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सर्वांना सोबत घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काम करणार असून , जास्तीत जास्त शेतकऱ्यांना संघटनेत सामील करून शरद जोशी यांना प्रेरित असलेले काम तालुक्यात उभे करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष माणिक निकम यांनी सांगितले. निकम यांच्या निवडीचे आमदार डॉ राहुल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, विठेवाडी येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत निकम ,संचालक महेंद्र आहेर ,कुबेर जाधव ,फुला आप्पा जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम