शेतकरी करतोय शरद जोशींना ‘मिस’; कांद्यावर साकारली शरद जोशींची प्रतिमा

0
14

राकेश आहेर

सटाणा : शेतकरी सद्या संकटात असल्याने कांदा उत्पादकांच्या भावना मांडण्यासाठी शेतकऱ्यांचे पंचप्राण असलेल्या स्वर्गीय शरद जोशी यांच्या जन्म दिनानिमित्त अभिवादन करताना सटाणा येथील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांद्यावर चक्क शेतकरी चळवळीतील नेते शरद जोशी साहेब यांची प्रतिमा साकारून आदरांजली दिली आहे.

सध्या कांद्याला अल्प प्रमाणात दर मिळत आहे शरद जोशी यांनी सर्वच शेतीमालाला विशेषतः कांद्याला खर्च वजा जाता योग्य दर मिळावा म्हणून खुप मोठी आंदोलने केली. त्यांच्या पश्चात आजही शेतकरी आंदोलन करत आहेत, आजही कांद्याचा खर्चही निघत नाही इतका तुटपुंज्या दर शेतकऱ्यांना मिळतो आहे. मात्र कुठलेही सरकार आले तरीही शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळवुन देण्यास असमर्थ आहे. कुणीही काही हालचाल करतांना दिसत नाही. एकीकडे रासायनिक खते, औषधे बि-बियाणे तसेच सर्वच वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांची उपजिविका भागवणारे महत्वाचे पिक कांदा आहे, पण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर आजही कांद्यास २ रुपये ते १२ रुपये किलो ईतका मातीमोल दर मिळत आहे.

शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविणे ही अवघड झाले आहे. म्हणून कांद्याला तीस रुपये किलो दराने हमी भाव मिळाला पाहिजे तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कांद्यावर व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी शरद जोशी यांची प्रतिमा पेंटिंग केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here