Shani Shingnapur | शनि शिंगणापुरच्या ‘शनि’ मंदिरात नेमकं काय घडतंय..?

0
11
Shani Dev
Shani Dev

Shani Shingnapur |  शनि देव म्हणजे न्यायाची देवता. शनि देवांना ‘कर्मफलदाता’ असेही म्हंटले जाते. शनीची कृपा झाल्यास भरभराट आणि साडेसाती सुरू असल्यास यातना होतात. त्यामुळे लोक आदरभावाने व मनपूर्वक शनि देवांची आराधना करतात. याच शनि देवांचे एक प्रसिद्ध मंदीर हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात शनि शिंगणापुर (Shani Shingnapur) येथे आहे. मात्र, हे मंदिर काही वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे.

दरम्यान, येथे येणाऱ्या शनि भक्तांची फसवणूक केल्याचा आरोप ह्या शनि शिंगणापुर (Shani Shingnapur) मंदिराच्या ट्रस्टवर करण्यात आलेला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ह्या मंदिराच्या ट्रस्टवर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिलेले असून, शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टने केलेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ आजूबाजूच्या गावातील स्थानिक हे उपोषण करीत आहेत.

Champa shashthi | आज ‘चंपाषष्ठी’च्या दिवशी असा करा देवाचा कुलधर्म

नेमकं प्रकरण काय..?

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न मंडला होता. शनि शिंगणापूर (Shani Shingnapur) मंदिर ट्रस्टमध्ये होत असलेल्या घोटाळ्याच्या निषेधार्थ शेजारील गावातील अनेक लोक हे उपोषणाला बसलेले आहेत. आणि आपण त्यांची भेट घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. पुढील आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्रस्टवर केलेले आहेत.

१. ह्या मंदिरात केवळ ६२ कर्मचाऱ्यांची गरज असून, येथे तब्बल १८०० कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवून केवळ १२ ते १३ कर्मचारी हे नियमित कामावर येतात.

२. ह्या मंदिराच्या व्यासपीठावर भक्तांना दर्शनासाठी दिली जाणारी तब्बल ५०० रुपयांची पावती ही शनि शिंगणापूर नाहीतर घनेश्वर ह्या खासगी ट्रस्टच्या नावाने दिली जाते. दरम्यान, यामुळे आतापर्यंत तब्बल दोन कोटींची हेराफेरी झाली आहे.

३. ह्या मंदिरात २४ तास वीज ही असूनही जनरेटर आणि डिझेलच्या नावाने दर वर्षाला तब्बल ४० लाख रुपयांचा खर्च हा दाखवला जातो.

४. ह्या मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामांसाठीही २० कोटींचा निधी दिलेला असून, बावनकुळे यांच्या नुसार, प्रत्यक्षात फक्त ५० कोटी इतकाच निधी खर्च झालेला असून, दाखवलेली कामे ही अजूनही अपूर्णच आहे.(Shani Shingnapur)

Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…

शनि शिंगणापूर मंदिराचे महात्म्य |(Shani Shingnapur) 

शनि देवांचे शनि शिंगणापूर येथील हे मंदिर अतिशय प्राचीन मंदिर असून, हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यात आहे. पौराणिक कथांनुसार, श्रावण महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील पाण्याची पातळी ही खूप वाढली होती. त्यावेळी  पावसाच्या पाण्यात वाहत एक मोठे काळ्या रंगाचे पाषाण शिंगणापूरच्या किनाऱ्यावर आले.

त्याच रात्री ह्या गावाच्या प्रमुखाच्या स्वप्नात शनिदेव आले आणि त्यांनी आपण स्वतः ह्या गावात त्या पाषाणाच्या रूपात आले असल्याचे सांगितले. दरम्यान, ग्राम प्रमुखाने ही सर्व बाब गावातील ग्रामस्थांना सांगितली असता, सर्वांनी मिळून ह्या गावच्या मध्यभागी शनिदेवाच्या पाषाणरूपी मूर्तीची स्थापना केली. (Shani Shingnapur)

घरांना दारवाजेच नाही |(Shani Shingnapur) 

पौराणिक मान्यतेनुसार, शनिदेव शिंगणापूर ह्या गावात शनि देवांच्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून, ह्या गावात आजपर्यंत कधीही चोरी किंवा दरोड्याची एकही घटना घडलेली नाही. हे संपूर्ण जगातील असे एकमेव गाव आहे की, जिथे आजही कुठल्याच घरांना दरवाजे नाहीत. तसेच येथील कुठल्याही घरांना कधीही कुलूप लावलेले नाहीत.(Shani Shingnapur)

असे सांगितले जाते की, या गावात अनेक वेळा अनेक लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापैकी कुणालाही यश आले नाही. आणि त्याचे परिणामदेखील त्यांना भोगावे लागले. दरम्यान, आता याच शनि शिंगणापूर मंदिराच्या ट्रस्टमध्येच चोरी झाल्याचे आणि फसवणूक झाल्याचे आरोप होत असल्याने सगळीकडूनच आश्चर्य व्यक्त होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here