द पॉईंट नाऊ ब्युरो : कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ठिकाणी 7 भ्रूण 5 बाटल्यांमध्ये भरून नाल्यात फेकण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या मुडलगी येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाटल्यांमध्ये भरून फेकण्यात आलेले हे भ्रूण 5 महिन्यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या भ्रूनांचे शव बाटलीमध्ये बंद करून फेकण्यात आले होते.
एकाच वेळी इतके भ्रूण सापडल्याने खळबळ उडाली असून, हे भ्रूण आता स्थानिक रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. नंतर ते तपासणीसाठी लॅब मध्ये पाठवले जाणार आहेत.
एकाच वेळी एवढे भ्रूण कुठून आले? ते कोणी फेकले? का फेकले? यामागे दोषी कोण? याचा तपास करण्यास सुरुवात झाली असून, यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
स्त्री जातीचे भ्रूण आढळून आल्याच्या घटना आत्तापर्यंत बऱ्याच वेळा घडल्या आहेत. अनधिकृतरीत्या गर्भलिंगनिदान चाचण्याद्वारे देखील असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम