Satana News | एलईडी पथदीप रुपांतरणाच्या कामात १ कोटी ६० लाख रुपयांची बचत करत “सटाणा नगरपालिका” ही राज्यात एकमेव नगरपालिका ठरली आहे. १५.५ चौरस किलोमीटर इतक्या परिसराच्या सटाणा ह्या शहरातील ८ हजार ४३१ मालमत्तांना जोडणारे ८८ किलोमीटर इतक्या लांबीच्या विद्युत लाइनवर सर्व नवीन एलईडी पथदीप हे बसविण्यात येणार आहेत.(Satana News)
त्यासाठी शासनमान्य दराचे २ कोटी २५ लाख इतक्या रुपयांचे एलईडी पथदीपाच्या रुपांतरणाचे काम हे सटाणा नगरपालिकेने स्वनिधीतून अवघ्या ६५ लाख रुपयांमध्ये पूर्ण करत त्यांनी १ कोटी ६० लाख इतके रुपये वाचवले आहेत. उर्जा बचतीसाठी महाराष्ट्र सरकारने जून २०१७ मध्ये उर्जा संवर्धन हे धोरण जाहीर करून सर्व नगरपालिका आणि महापालिकांना पथदीपासाठी फक्त एलईडी पथदीप घेण्याचे बंधनकारक होते.(Satana News)
पण, सटाणा नगरपालिकेने जुन्या तंत्रज्ञानाचे तसेच पिवळसर प्रकाश देणारे २५० व्हॅटचे सोडियम व्हेपर लॅम्प आणि १५० व्हॅटचे मक्युरी व्हेपर लॅम्प व ११० व्हॅटचे फ्लोरोसन्ट ट्युब पिक्चर सेट, ७५ व्हॅटचे सीएफएल ट्युब फिक्चर सेट हे बदलून ४५ व्हॅट इतक्या कमी उर्जेत जास्त आणि पांढरा शुभ्र प्रकाश देणारे एलईडी पथदीपांचे रुपांतरणाचे काम हे मार्च २०१६ पासूनच प्रत्यक्षात सुरु केलेले होते.(Satana News)
winter session | फडणवीसांसमोर अजित दादांची माघार; मलिकांवरून जुंपली
जानेवारी २०१८ मध्ये शासनाने पुन्हा एक निर्णय घेऊन नगरपरिषद आणि महापालिकांनी कोणत्याही शासकीय निधीतून पथदीप खरेदी न करता फक्त शासनाने करार केलेल्या इइएसएल ह्या कंपनी कडूनच पथदीपांच्या खरेदी करण्याचे बंधन घातले होते.(Satana News)
त्यानुसार, ह्या कंपनीने महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना त्यांचे प्रस्ताव पाठवले. त्यात सटाणा शहरातील पथदीप रुपांतरण आणि अनुषंगिक कामांसाठी १२.५ टक्के फ्लॅट व्याजदराचा आणि प्रतिमाह २ लाख ६२ हजार रुपयांचे ८६ परतफेड हपत्यांचं रुपये २ कोटी २५ लाख इतक्या रुपयांचा प्रस्ताव दिला आहे.(Satana News)
शासन प्रस्तावाचा सटाणा नगरपरिषद विद्युत विभाग प्रमुख हिरालाल दत्तात्रेय कापडणीस यांनी सखोल अभ्यास करून ह्या कंपनीचा प्रस्ताव तीनपट महाग असल्याचा आणि नगरपरिषदांच्या हिताचा नसल्याचा अहवालदेखील तयार केला. तत्कालीन नगराध्यक्ष सुनील मोरे यांना हा प्रस्ताव सादर केला असता, त्यांनीही हा विषय सकारात्मक घेत तत्काळ विषय पत्रिकेत घेऊन सभागृहाची मान्यता घेतली आहे. (Satana News) साटाणा नगरपालिकेने मार्च २०१६ मध्ये सुरु केलेले एलईडी पथदीपांचे रुपांतरणाचे हे काम निधीच्या उपलब्धतेनुसार ७ वर्षात २१ टप्प्यात ६५ लाख रुपयामध्ये पूर्ण करून शासनाचे १ कोटी ६० लाख रुपयांची बचत केलेली आहे.
Gold Silver Price | सोने-चांदीची ग्राहकांसाठी गुड न्यूज
उर्जा बचतीसाठी शासन हे पुरस्कृत असलेली एस्सेल कंपनी यांच्या कडूनच खरेदीचे शासन निर्णयांचे बंधन असताना, त्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास केल्यामुळे कायदेशीर रित्या दुसरा पर्याय शोधला. यामुळे सटाणा नगरपालिकेचे २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही वाचली आहे.(Satana News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम